top of page
007.jpg

निढळ विकासाची वैशिष्ट्ये

भौतिक विकास  + आर्थिक विकास  +  मानव विकास
निढळ - ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न (Excerpts)

"निढळ गावाच्या अत्यावश्यक भौतिक गरजा जरी भागविल्या तरी दुष्काळी माणदेशातील गावांची आणि तिथल्या कुटुंबांची आर्थिक उन्नती झाल्याशिवाय भौतिक विकासाला काही अर्थ नाही, हे भान तेव्हा प्रशासनात दहा-बारा वर्षे अनुभव असणार्‍या श्री. दळवींच्या लक्षात यायला वेळ लागला नाही."

"भौतिक विकासासोबत गावातील शेती सुधारली, तरच आर्थिक उन्नती होणार होती आणि शेती सुधारायची असेल, तर पाण्याशिवाय पर्याय नव्हता. श्री. दळवी यांचे शिक्षण एम.एस्सी. (अ‍ॅग्रि.) असल्याने दुष्काळी भागासाठी ‘पाणलोट विकास’ हा पर्याय असल्याची त्यांना पूर्ण जाणीव होती."

Hon. Shri. Dalvi Sir 01-09-2023.jpeg
श्री. चंद्रकांत दळवी, IAS (Retd.)
अध्यक्ष, सत्त्व फाउंडेशन

Email me at: cndalvi@yahoo.co.in

निढळ पाणलोट विकासाची वैशिष्ट्ये
  1. पाणलोट विकासाचा सन २००६ पर्यंत देशातील एका गावासाठीचा २००१ हेक्टरवरचा सर्वांत मोठा प्रकल्प.

  2. क्षेत्र आणि प्रकल्पाच्या आराखड्याचा आकार (रक्कम) विचारात घेता देशातील सर्वांत मोठा प्रकल्प.

  3. स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ) मदतीशिवाय ग्राम पाणलोट विकास समितीने राबविलेला देशातील पहिला प्रकल्प.

  4. ३५-४० डिग्रीपेक्षा अधिक डोंगर उतारावर राबविलेला पहिला यशस्वी प्रकल्प. या डोंगरावरील उपचार हेच खर्‍या अर्थाने निढळ पाणलोट विकासाच्या जलवाहिन्या ठरल्या आहेत.

  5. निर्धारित ५ वर्षापेक्षा कमी कालावधीत राबविलेला देशातील पहिला पाणलोट प्रकल्प.

  6.  मंजूर प्रकल्प किमतीपेक्षा कमी रकमेत राबविलेला व शिल्लक रक्कम २०१४ साली ३ लाख ६८ हजार ९५० रुपये ‘नाबार्ड’ला परत केलेला देशातील पहिलाच प्रकल्प.

  7. २० टक्के श्रमदान, चराईबंदी, कुर्‍हाडबंदी, नसबंदी आणि नशाबंदी या पंचसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी ही या पाणलोटाच्या यशस्वितेची प्रमुख सूत्रे आहेत.

  8. माथा ते पायथा या सूत्रानुसार 'प्रथम क्षेत्रीय उपचार आणि नंतर ओढ्यावरील उपचार' या तत्त्वाचे काटेकोर पालन केल्यामुळे प्रकल्प १०० टक्के यशस्वी झाला.   

  9. डोंगरउतारावर प्रथम ‘स्टोन बंडिंग’ आणि त्यावर ‘सलग समतल चर’ (सीसीटी) व त्यावर वृक्षलागवड केल्यामुळे बोडक्या डोंगराचे जंगलात रूपांतर झाले आहे.

  10. डोंगर उतारावर ओघळीमध्ये दगडीबांध, डोंगर पायथा व माळरानातील ओघळीवर माती नाला बांध, सर्वत्र माळरानावर सीसीटी आणि शेतीच्या जमिनीमध्ये १०० टक्के कंपार्टमेंट बंडिंगची कामे.

  11.  चार मुख्य ओढ्यांवर सिमेंट बंधार्‍यांची मालिका.

निढळ गावाला मिळालेले पुरस्कार

 

वर्ष             पुरस्कार

 

  • १९८७-८८ - अस्पृश्यता निवारण कामासाठी सातारा जिल्हा परिषदेकडून गौरव

  • २००१-०२ - महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात १२ लाख ५० हजारांचा पहिला पुरस्कार

  • २००३-०४ - महात्मा फुले जलसंधारण अभियानात सातारा जिल्ह्यात १ लाख ५० हजारांचा प्रथम पुरस्कार

  • २००७-०८ - राष्ट्रपतींच्या हस्ते स्वच्छतेचा निर्मलग्राम पुरस्कार, सन्मानपत्र व रु. ५ लाख

  • २००७-०८ - सार्क व्हिलेज साठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून निढळ गावाची शिफारस

  • २००७-०८ - भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून निढळची विमाग्राम म्हणून घोषणा व २५ हजारांचा पुरस्कार

  • २००८-०९ - महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार व रु. ५ लाखांचा धनादेश

  • २००८-०९ - जलसंधारणाच्या कामासाठी केंद्र शासनाचा ‘नॅशनल वॉटर अ‍ॅवॉर्ड’ व रु. एक लाखांचा धनादेश

  • २०१०-११ - केंद्र सरकारचा भूमी जलसंवर्धनसाठीचे ‘वॉटर’ अवॉर्ड

  • २०११-१२ - महाराष्ट्र शासनाचा इको व्हिलेज पुरस्कार व रु. ५ लाखांचा धनादेश

  • २०११-१२ - शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी रयत शिक्षण संस्थेचा कर्मवीर आदर्श हायस्कूल पुरस्कार

  • Grey Twitter Icon
  • Grey LinkedIn Icon
  • Grey Facebook Icon

© 2035 by Talking Business. Powered and secured by Wix

bottom of page